
पुणे : औंध येथील गजबजलेल्या संघवी नगर येथील मुख्य रस्त्यावरील दुकानांमध्ये रात्री एकाच वेळी चार दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे.
परिहार चौक ते ब्रेमेन चौक दरम्यान असलेल्या स्मार्ट सिटी रस्त्यावरील दुकानात चोरट्यांनी दुकानांची शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करून सामानाची चोरी केली. कँटाबील हे कपड्याचे दुकान, चष्म्यांचे व्हिजन एक्सप्रेस, प्युअर इलेमेंट्स या महिलांच्या सौंदर्यप्रसाधनाच्या तर ट्रेंड फुटवेअर या पादत्राणाच्या दुकानाचे वटर उचकटून चोरटे आत शिरले होते.
यात किती रकमेचा मुद्देमाल चोरीला गेला आहे याची अजून पूर्ण माहिती मिळाली नाही. चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास चालू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.