नारायणगाव - उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून, मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या व भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण करून त्याची लूटमार करणाऱ्या तीन गावगुंडांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यापैकी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. अटक आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार दिली.