surgery by robot in pune
sakal
पुणे - संस्कृती, शिक्षण आणि इतिहासाची परंपरा लाभलेले शहर, या ओळखीपलीकडे जाऊन पुणे झपाट्याने भारताच्या ‘मेडिकल टेक्नॉलॉजी राजधानी’ म्हणून उदयास येत आहे. अत्याधुनिक रुग्णालये, जागतिक दर्जाचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि विशेषतः मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या ‘रोबो-सहाय्यित शस्त्रक्रिया’ या सर्वांची जोड मिळून पुणे सर्वांत वेगाने विकसित होणारे ‘रोबोटिक सर्जरी हब’ बनत आहे. दरवर्षी हजारो अशा शस्त्रक्रिया होत असल्याने, वैद्यकीय उपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाची नवी ओळख निर्माण होत आहे.