रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघ्यावर शस्त्रक्रिया सुलभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पिंपरी - गुडघ्यावरील अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानामुळे सहज शक्‍य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दीड वर्षात शहरातील सुमारे साडेतीन हजार रुग्णांना या शस्त्रक्रियेचा लाभ झाला आहे.

पिंपरी - गुडघ्यावरील अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानामुळे सहज शक्‍य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दीड वर्षात शहरातील सुमारे साडेतीन हजार रुग्णांना या शस्त्रक्रियेचा लाभ झाला आहे.

गुडघ्यावर शस्त्रक्रिया करायची म्हणजे रुग्णाच्या मनात अगोदर भीती निर्माण होते. शस्त्रक्रियेनंतर आपल्याला चालता येईल का?, पुन्हा त्रास तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्‍न मनात निर्माण होतात. मात्र, या सर्व प्रश्‍नांवर रोबोटिक तंत्रज्ञानामुळे उत्तर सापडले आहे. शस्त्रक्रिया सुलभ होत असल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी, अनेकांच्या मनात रोबोटिक तंत्रज्ञानाबाबत काही शंकाही आहेत. त्यांचे निरसन करण्यासाठी डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्याशी संपर्क साधला. रोबोटिक तंत्रज्ञानाबाबत डॉ. जोशी म्हणाले, 'संगणकाद्वारे रोबोला दिलेल्या सूचनांनुसार गुडघ्याचा कोणता भाग किती प्रमाणात खराब झाला आहे, याची अचूक माहिती शल्यचिकित्सकाला मिळते. सांध्यांच्या खराब झालेल्या जागेची त्रिमितीय आभासी प्रतिमा संगणकावर बनविली जाते.

त्यानुसार गुडघ्याचा फक्त खराब भाग रोबोच्या साह्याने काढून त्याजागी कृत्रिम सांधा बसविला जातो. रोबोचा वापर करून गुडघ्यांवरची शस्त्रक्रिया नेमकी कशी करावी, याचे प्रशिक्षणही लोकमान्य रुग्णालयात देण्यात येते. आतापर्यंत देश-विदेशातील सुमारे 50 डॉक्‍टरांना या बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.''

शस्त्रक्रियेची कारणे
साधारणतः 60 वर्षांवरील नागरिकांना गुडघेदुखीचा तीव्र त्रास जाणवत असतो. तसेच, वाढत्या वजनाचा शरीरावर भार पडून किंवा मांडी घालून बसताना शरीराच्या वजनाचा अतिरिक्त भार पडत असल्याने गुडघ्यांना इजा होते.

रोबोटिकचे फायदे
- मधुमेह, थायरॉईड, हृदयरोग रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना गुंतागुंत कमी
- परावलंबित्व कमी झाल्याने जीवनमानाचा दर्जा उंचावतो
- मानवी चुकांमुळे शस्त्रक्रियेमध्ये होणाऱ्या चुकांचे प्रमाण कमी
- शस्त्रक्रियेनंतर काही तासांत शरीराची हालचाल शक्‍य
कोट
'काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास वाढून गुडघ्याची गादी फाटली होती. रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि काही दिवसांतच मला 95 टक्‍क्‍यांहून जास्त फरक पडला आहे.''
- संगीता पोटे, रुग्ण, निगडी

'बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन, पोषण आहाराचा अभाव यांमुळे सांधेदुखी उद्‌भवते. रोबोटिक तंत्रज्ञानाच्या आधारे गेल्या दीड वर्षांत आम्ही साडेतीन हजारांवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत.''
- डॉ. श्रीकृष्ण जोशी, चिंचवड

Web Title: Robotic technology facilitates knee surgery