Pune: पुण्यातील शाळेत तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळणार; प्राथमिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे धडे

Pune News: भारत ज्ञान विज्ञान फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. शिगवे शाळेत तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळाली आहे. विशेष कार्यशाळा घेण्यात आली होती.
Robotics

Robotics

ESakal

Updated on

भारत ज्ञान विज्ञान फाउंडेशन यांच्या वतीने पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिगवे (Z.P.P.S Shigave) येथे रोबोटिक्स व STEM विषयांवरील शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण करणे, नवोन्मेषी विचारसरणी विकसित करणे तसेच हँड्स-ऑन शिक्षणाच्या माध्यमातून रोबोटिक्सची ओळख करून देणे हा होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com