गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉडर्समध्ये २५ जणांची नोंद

कात्रजमधील रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंचा विक्रम
Rock On Wheel Skating Academy 25 athletes listed in Guinness Book of World Records
Rock On Wheel Skating Academy 25 athletes listed in Guinness Book of World RecordsSakal

कात्रज - सलग ९६ तासांच्या स्केटिंगची गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉडर्स मध्ये नोंद झाली आहे. नुकत्याच बेळगांव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आयोजित सलग ९६ तास स्केट्स मोटो फॉर्मशनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कात्रज-कोंढवा रस्त्यावरील रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडेमीच्या २५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. वयाच्या अगदी ४ वर्षांपासून ते १४ वर्ष वयाच्या खेळाडूंनी सहभाग घेत सलग ९६ तास स्केटिंग करून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या विश्वविक्रमाची गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. या स्पर्धेत संपूर्ण देशातुन ४९० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी ९६ तासाचे लार्जेस्ट स्केट मोटो फॉर्मेशन स्केटिंग आयोजन करण्यात आले. या विक्रमासाठी प्रमुख पंचामध्ये आंतरराष्टीय प्रशिक्षक विजय मलजी यांची निवड करण्यात आली. या विश्वविक्रमाकरिता पुणे येथुन आयुष वलसटवार, रेश्नव जगताप, वेद बिराजदार, हर्ष घुमाडे, मनस्वी पिंपरे, कायरा बुरड, दिव्यांका चवरे, श्लोक भेलके, अथर्व आकळे, अशर शेख, श्रवल भोसले, युवराज कदम, श्रेयांश वाघमोडे, वरद भोकरे, ईश्वरी लिमन, रियांसीका चवरे, प्रणवी डोईफोडे, समृद्धी एडके, ज्ञानदा कदम, मनश्री हाडके, वेदांत तळेकर, चंद्रशेखर बसरकोड, रुद्राक्ष पवार, मृणाल फुलसुंदर, श्लोक दोषी या खेळाडूंनी आपली चमक दाखवत गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉडर्समध्ये नोंद केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com