

संगीता भापकर, मोरगाव (ता. बारामती)
ग्रामीण विकासासाठी काम करणारे नेतृत्व केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीवर उभे असते. समाजातील सर्व घटकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणारे नेतृत्व आजच्या काळाची गरज आहे. अशाच सामाजिक बांधिलकी जपत काम करणाऱ्या सौ. रोहिणी संदीप कदम-ढोले (जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, एस.एम.के. फाउंडेशन, पुणे) यांनी पद नसतानाही अनेक उपक्रम राबवून समाजासाठी काम केले आहे. महिलांनी समाजाच्या विकासात नेतृत्वाची धुरा स्वीकारली तर परिवर्तनाचा वेग अधिक वाढतो, याचे उदाहरण म्हणजे सौ. रोहिणी कदम-ढोले. सातारा जिल्ह्यातील साध्या कुटुंबात वाढलेल्या रोहिणी यांनी शिक्षण आणि सामाजिक कार्य यांचा समतोल साधत समाजासाठी अनेक उपक्रम राबवले. शेतकऱ्यांसाठी पाणीपुरवठा योजना, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना मदत, युवकांसाठी क्रीडा स्पर्धा आणि धार्मिक-सांस्कृतिक कामे अशा विविध माध्यमातून त्यांनी लोकांशी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. समाजासाठी काम करण्याची जिद्द आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते यामुळे त्यांचे नेतृत्व ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
---------------------------------------------------------------------------------
रोहिणी संदीप कदम-ढोले (शिक्षण : बी.एस्सी., बी.एड., एम.एड., जी.डी.सी. अँड ए., डी.एस.एम., पीएचडी- ॅपिअर) यांचे माहेर सातारा जिल्ह्यातील राऊतवाडी येथे आहे. त्यांचे वडील बबनराव शिंगटे हे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे लहानपणापासूनच शिक्षणाचे महत्त्व आणि समाजसेवेचे संस्कार त्यांना घरातून मिळाले. शिक्षण घेत असताना त्यांनी समाजातील विविध प्रश्न जवळून पाहिले आणि त्यावर काहीतरी सकारात्मक काम करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण झाली. ग्रामीण भागाचा विकास हा केवळ आश्वासनांवर होत नाही; त्यासाठी सातत्याने लोकांमध्ये राहून काम करणारे नेतृत्व आवश्यक असते. समाजातील सर्व घटकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणारे नेतृत्व आजच्या काळाची गरज आहे. रोहिणी कदम यांनी सत्ता किंवा पद नसतानाही समाजासाठी अनेक उपक्रम राबवून प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे.
शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या भागाला ओलिताखाली आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पुरंदर उपसा सिंचन योजनेअंतर्गत जोगवडी ते ढोलेमळा आणि खटकळी ओढ्यापर्यंत पाइपलाइन कार्यान्वित करण्यात आली. या कामासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सीरम इन्स्टिट्यूटच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांची मदत मिळविण्यात आली. या पाइपलाइनमुळे अनेक शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता झाली आणि शेतीला नवी उभारी मिळाली. पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि शेती अधिक उत्पादनक्षम बनली. कूपनलिका आणि पाणीपुरवठा योजनांमुळेही अनेक गावांतील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. आरोग्य क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांना मोफत तपासणी आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. कोरोना संसर्गाच्या काळात अनेक कुटुंबे अडचणीत सापडली होती. अशा कठीण परिस्थितीत रोहिणी कदम यांनी गरजू नागरिकांना अन्नधान्य, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी उभे राहणे हेच खरे सामाजिक नेतृत्व असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन वाड्या-वस्त्यांवर पथदिवे बसविण्यात आले. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अनेक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, आर्थिक मदत आणि मार्गदर्शन देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले. काही विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मदत करून मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या. युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी अजितदादा पवार चषक भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. खेळातून शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना निर्माण होते. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना योग्य दिशा देण्याचे काम करण्यात आले.
ज्ञान संस्कृती जपण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांची उभारणी करण्यात आली. वाचनाच्या माध्यमातून समाजाचा बौद्धिक विकास होतो, असा त्यांचा विश्वास आहे.धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मोरगाव येथील कदम वस्तीवरील श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. तसेच पंढरपूर व वाखारी येथे भाविकांसाठी सुमारे पाच हजार चौरस फुटांचे भक्तनिवास बांधण्यात आले. या कामांमुळे भाविकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच वारकरी भवन उभारून वारकरी परंपरेला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मयुरेश्वर भक्तांसाठी पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे.
समाजातील प्रत्येक घटकाबद्दल संवेदनशीलता ही त्यांच्या कार्याची ओळख आहे. दिव्यांग बांधवांना मदत देऊन समाजात समावेशकतेची भावना बळकट करण्यात आली. पूरग्रस्तांना मदत करून आपत्तीच्या काळातही लोकांना आधार दिला. शाळेच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांसाठी ५००० लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी देण्यात आली. विविध सामाजिक उपक्रमांमधून लोकांशी थेट संवाद साधत त्यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे.त्यांच्या या सामाजिक कार्यामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा पाठिंबा आहे. विशेषतः पती संदीप कदम यांचा त्यांना मोठा आधार मिळाला. संदीप कदम हे पुणे महानगरपालिकेचे उपआयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशासनातील अनुभव आणि विकासदृष्टी यांचा रोहिणी कदम यांच्या सामाजिक कार्यावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. कुटुंब आणि समाज यांचा समतोल साधत त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले.
रोहिणी संदीप कदम-ढोले यांचे कार्य आणि समाजाशी असलेले नाते पाहता त्या विकासाचा मजबूत पाया घालू शकतात, याबद्दल शंका नाही. जर त्या उच्चांकी मताधिक्याने जिल्हा परिषदेत निवडून गेल्या, तर आपल्या भागाला सक्षम प्रतिनिधित्व मिळेल. जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या पदांवर आपल्या भागातील प्रतिनिधी पोहोचण्याची संधी निर्माण होईल आणि विकासकामांची गती निश्चितच वाढेल. महिला सक्षमीकरणासाठी व सामाजिक बांधिलकी जपत तळागाळातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक गोष्टीची बारकाईने माहिती घेणे आणि वस्तुस्थिती व परिस्थिती यांचा ताळमेळ घालून प्रश्न मार्गी लावणे हे रोहिणी कदम यांचे कौशल्य कौतुकास्पद आहे. ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी स्वतःच्या कर्तृत्वाने आणि नम्रता व योग्य पद्धतीने समन्वय सुसंवादाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची त्यांची खासियत आहे. जागतिक महिला दिन हा केवळ महिलांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर समाज परिवर्तनात त्यांच्या नेतृत्वाची ताकद ओळखण्याचा दिवस आहे. सौ. रोहिणी कदम यांसारख्या महिलांच्या कार्यातून ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळत आहे.चला, या महिला दिनाच्या प्रेरणेने समाजाच्या विकासासाठी समर्पित अशा नेतृत्वाला पाठिंबा देऊया आणि प्रगतीच्या या प्रवासात सहभागी होऊया.
उपजत गुण लक्षवेधी
निरपेक्ष आणि निःस्वार्थीपणे येणाऱ्या प्रत्येकाची कामे करणे हा रोहिणी यांचे उपजत गुण लक्षवेधी आहे. पुणे जिल्हा परिषद व एस. एम. के. फाउंडेशन यांच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या सोडविणे, दुर्बल , वंचित घटकासाठी काम करणे यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व कायम सदाबहार असते. राजकारणात त्या नवीन असल्या तरी त्यांचे शिक्षण, प्रामाणिक सामाजिक कार्य आणि काम करण्याची जिद्द पाहूनच जिल्ह्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली. हे त्यांच्या कार्याची पावती आहे. महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याचा हा सकारात्मक संदेशही आहे. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अशा सक्षम महिलांचे नेतृत्व समाजासाठी प्रेरणादायी ठरते.
दादांचा विकासाचा विचार पुढे नेण्याचा संकल्प
तत्कालीन उपमुख्यमंत्री, शेतकऱ्यांचे हितचिंतक अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण कृतज्ञतेने करावी लागते. ग्रामीण विकास, पाणी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक कार्यकर्त्यांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या अकाली निधनामुळे समाजाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे, असे रोहिणी संदीप कदम-ढोले आवर्जुन सांगतात.
03543, ॅपिEpiyaॅ03546, 03547
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.