Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धमक्या ; आमदार रोहित पवार

खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये जो अजितदादा मित्र मंडळाचा पक्ष आहे तो पक्ष, त्या पक्षाचे लाभार्थी व काही भाजपचे नेते बारामती लोकसभा मतदारसंघातील आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना धमकवत आहेत
Baramati Loksabh
Baramati Loksabh

काटेवाडी : खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये जो अजितदादा मित्र मंडळाचा पक्ष आहे तो पक्ष, त्या पक्षाचे लाभार्थी व काही भाजपचे नेते बारामती लोकसभा मतदारसंघातील आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना धमकवत आहेत, असे आमचे मत आहे अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तसेच भाजपच्या काही नेत्यांवर नाव न घेता आरोप केले.

कनेरी येथील मारुती मंदिर परिसरात शनिवारी(ता. १३) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संवाद दौरा पार पडला. कार्यक्रमानंतर माध्यमांशी आमदार रोहित पवार बोलत होते. ते म्हणाले, बारामतीमध्ये काही लाभार्थी व ठेकेदार मंडळी सर्वसामान्य लोकांना धमकवत आहे. बारामतीची जनता त्यांना मलिदा गॅंग म्हणून ओळखते.

यामध्ये पीडीसीसी बँकेचे पदाधिकारी कर्मचारी देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज वगैरे प्रकरणांमध्ये तुमची संपत्ती जप्त करू अशा पद्धतीने धमकवत आहेत. तर शहरी भागामध्ये गुंडांचा वापर होत आहे. या भागात राहायचे असेल तर तुम्ही पवार साहेबांचा प्रचार करू नका अशा पद्धतीने गुंडांकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. असे प्रकार होत असून, ही माहिती आम्हाला सर्वसामान्य लोकांकडून मिळत आहे. अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये यापूर्वी कधीही नव्हती.

या अशा पद्धतीच्या प्रथेला यश आले तर इथून पुढे विकास कोणीही करणार नाही फक्त गुंडांना पाळले जाईल. त्यामुळे दडपशाहीचे राजकारण वाढत जाईल. म्हणून हे कार्यकर्ते एकत्र येऊन कार्यकर्ते कमीत कमी तीन लाखाच्या मताधिक्याने सुप्रिया ताईंना निवडून देतील. साहेब कोणाला भेटतात यापेक्षा साहेबांच्या सोबत सर्वसामान्य जनता आहे हे पहा, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या घेतलेल्या भेटींबाबत वक्तव्य केले.

अजितदादांनी धाडस दाखवावे भावांची नावे घ्यावीत...

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली होती. यावेळी त्यांनी माझे भाऊ कधी माझ्या प्रचारात फिरले नाहीत. पण आता फार वळवळ करत आहेत. मी जर काही बोललो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशा शब्दात टीका केली होती. यावर माध्यमांनी आमदार रोहित पवार यांना छेडले असता ते म्हणाले, अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी का करत आहेत.

Baramati Loksabh
Loksabha Election 2024 : न्यायाची हमी देणारा दस्तावेज ; काँग्रेसने मांडले ‘नवसंकल्प आर्थिक धोरण’

तुमच्यात जर धाडस असेल तर त्या भावांचे नाव घ्या. काय प्रकरण आहे ते कळू द्या. लोकांसमोर येऊ द्या. काय दूध का दूध और पाणी का पाणी असेल ते कळेल. उगाच भावंडांबाबत मोघम स्टेटमेंट देऊन बदनामी का करता. तुमच्या प्रचारासाठी तुमची भावंडे बहिणी यापूर्वी लोकांमध्ये फिरले आहेत. हे लोकांमध्ये जाऊन विचारलं तर ते सांगतील. त्यामुळे अजित दादांनी भावंडांचे नाव घ्यावे व काय प्रकरण आहे हे सांगावे. त्यावर त्यांची भावंडे देखील बोलतील. कदाचित या प्रकरणांवर ते त्यांचे स्पष्टीकरण देतील परंतु त्यानंतर ते अजितदादांवर देखील बोलतील. या वेगळ्या प्रकारच्या राजकारणामध्ये अजितदादांनी जाऊ नये, एक छोटा कार्यकर्ता म्हणून तसेच कुटुंबाचा एक घटक म्हणून मी त्यांना विनंती करतो, असे यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले.

अजितदादा जे बोलतात ते सगळेच कुठे खरं असतं....

शिवतरेंना माघार घेऊ नये म्हणून पवार कुटुंबातील कुणाचा फोन केला हे कुठे सिद्ध झाले आहे. अजितदादांना कदाचित आश्चर्य वाटला असेल, अजित दादा आज भाजप व शिंदे गटासोबत सत्तेत आहेत. शिवतरेना कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा फोन गेले असू शकतात. त्यामुळे अजित दादांना कदाचित आश्चर्य वाटला असेल ज्यांच्या सोबत मी सत्तेत आहेत त्यांचेच फोन शिवतारेंना माझ्या विरोधात बोलण्यासाठी गेले असावेत. यावर अजितदादा स्पष्टपणे बोलू शकतील. मात्र अजितदादा जे बोलतात ते सगळं खरंच कुठे असतं असा मिश्किल सवाल देखील यावेळी आमदार रोहित पवार यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com