

Rohit Pawar Slams BJP Over Pune Municipal Elections
Sakal
पुणे : "महापालिका निवडणुकीत भाजप निवडून आला नाही, तर खापर आपल्यावरच फुटेल म्हणून मुरलीधर मोहोळ घाबरले आहेत." अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निवडणूक प्रभारी व आमदार रोहित पवार यांनी मोहोळ यांच्यावर टीका केली. तर "गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट देण्याच्या विषयावरून मोहोळ अजित दादांना चॅलेंज दिले आहे. दादांना कशाला चॅलेंज करता, गुंडाच्या पासपोर्ट विषयी मीच तुमच्याशी बोलायला तयार आहे" असे प्रतिआव्हान पवार यांनी मोहोळ यांना दिले.