पुणे : कन्नड कारखान्यासंबंधी सक्तवसुली संचालनालयाने (ED) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. माझ्या चौकशीमध्ये त्यांना काही सापडले नाही, तरीही त्यांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची चूक केलेली नसल्याने आम्हाला न्यायालयातूनच न्याय मिळेल. आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईल. आम्ही घाबरणाऱ्यांमधील, पळून जाणाऱ्यांमधील नव्हे, तर लढणाऱ्यांमधील आहोत.' अशा शब्दात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ईडीविरुद्धची लढाई न्यायालयात लढणार असल्याचे शनिवारी सांगितले.