MLA Rohit Pawar
sakal
बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटना प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी (ता. 26) बारामती तालुका पोलिस ठाण्यात येत गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली. त्यांच्यासमवेत विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार हेही होते.