रोहित पवार यांनी घेतल्या
विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटी

रोहित पवार यांनी घेतल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटी

Published on

रोहित पवार यांनी घेतल्या
विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटी
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ७ : दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित व्हावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणे सुरू केले. या मालिकेत त्यांनी आज आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यासाठी मदत मागितली.
अरविंद केजरीवाल यांच्याशी झालेल्या भेटीआधी रोहित पवार यांनी आपचे खासदार संजय सिंह यांचीही रोहित पवार यांनी भेट घेतली होती. संसदेच्या अधिवेशनादरम्यान रोहित पवार यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी, सपचे प्रमुख अखिलेश यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तसेच विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना भेटीचेही नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले. केजरीवाल यांच्याशी रोहित पवार यांनी विमान अपघाताबद्दल चर्चा केली आणि आतापर्यंत जमा करण्यात आलेल्या माहितीबद्दल सादरीकरणही केले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले, की महाराष्ट्रात जर प्रमुख नेत्याला न्याय मिळत नसेल, हा मुद्दा संसदेत उपस्थित होणे आवश्यक आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा उल्लेख करून भाजपला लक्ष्य केले. कोलकाता येथील आंदोलनादरम्यान त्यांनी भाषणात बोलताना भाजपवर कोणालाही कार्यकाळ पूर्ण करू दिला जात नाही, असा प्रहार केला. त्या म्हणाल्या, की या अपघाताची योग्य चौकशी व्हावी, अशी आपण आपणच सर्वात आधी मागणी केली होती. मात्र असे का बोलले जात आहे, असे म्हणत अनेकांनी आक्षेप घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com