
पुणे : ‘‘अजित पवार यांच्यावर यापूर्वी खोटे आरोप झाले असतानाही त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. आता ते पक्षप्रमुख आहेत. मात्र, त्यांच्या मंत्र्यांकडून बेताल वर्तन होत असताना ते गप्प का? त्यांचे स्वतःवर नियंत्रण आहे, पण मंत्र्यांवर नाही का?’’ असा सवाल आमदार रोहित पवार यांनी करत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.