जुन्नर - अवघा साडेचार वर्षाचा रोनक व ११ वर्षाच्या सुमेध शशिकांत मडके या दोन भावंडांनी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पाच गडकोट व एक खिंड, असा एकूण २७ किलोमीटरचा पायी ट्रेक दोन दिवसांत पूर्ण केला आहे. या साहसी कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.