
Food Corruption
Sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या खासगीकरणानंतर ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना किडलेले आणि निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवले जात आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. या वेळी डॉ. अभिजित मोरे, श्रीकांत आचार्य, किशोर मुजूमदार उपस्थित होते.