

PNE26W59482
अहिल्यानगर ः मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षातर्फे शहरात सुरू असलेल्या साखळी उपोषणात राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांनी सहभाग नोंदवला.
राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही
राजेंद्र गवई ः रिपाइंचे साखळी उपोषण सुरू
अहिल्यानगर, ता. १७ ः निवडणूक आयोगाच्या कामकाजात कथित अनियमितता होत असल्याच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी रिपाइंने केली आहे. या मागणीवर पक्ष ठाम आहे. राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. राजीनामा घेतल्याशिवाय रिपाइं माघार घेणार नाही, असा निर्धार रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांनी व्यक्त केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासह विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया रद्द करावी, या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षातर्फे अहिल्यानगर शहरात साखळी उपोषण सुरू आहे. मार्केट यार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाचा शनिवारी (ता.१७) नववा दिवस होता. गवई यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणात सहभाग नोंदवला. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेमुळे पात्र नागरिकांची नावे चुकीने वगळली गेल्यास संबंधित नागरिक मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहू शकतात, अशी चिंता व्यक्त केली आहे. या आंदोलनात रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दादासाहेब रोहम, किशोर वाघमारे, दत्ताभाऊ झावरे, गुलाम शेख, विजय शिरसाठ, अजीम खान, नईम शेख, विल्सन रुकडीकर, ज्योती पवार, संपदा म्हस्के, मनीषा गायकवाड आदींनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.