दलितांवरील अत्याचाराविरोधात 'आरपीआय'ची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

कन्नड तालुक्‍यातील नेवापूर येथे पोलिसांकरवी कोंबिंग ऑपरेशन करून बौद्ध समाजातील नागरिक आणि मुलांना अमानुषपणे मारहाण केली.

पुणे : दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात तसेच अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.११) शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्त्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. जालना येथील पाणशेंद्रा गावात बौद्ध तरुणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. 

मराठा आरक्षणाच्या स्थगितीस राज्याचे महाधिवक्ताच जबाबदार; मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

कन्नड तालुक्‍यातील नेवापूर येथे पोलिसांकरवी कोंबिंग ऑपरेशन करून बौद्ध समाजातील नागरिक आणि मुलांना अमानुषपणे मारहाण केली. दलित समाजावर हल्ले होत असताना मूग गिळून गप्प बसलेल्या सरकारला जाग यावी, यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आल्याचे सोनवणे यांनी या वेळी सांगितले. 

या आंदोलनात अशोक शिरोळे, बसवराज गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, मंदार जोशी, बाबूराव घाडगे, निलेश आल्हाट, मोहन जगताप, शाम सदाफुले, शशिकला वाघमारे, लियाकत शेख, प्रमोद कदम, बाळासाहेब जगताप, संतोष खरात, उध्दव चिलवंत, के. जी. पवळे, बाळासाहेब शेलार यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPI protests against atrocities on Dalits in front of Pune Collectors office