कोणी चिल्लर घेता का चिल्लर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पुणे - पीएमपीकडे साठलेली सुमारे २० लाख रुपयांहून अधिकची चिल्लर स्वीकारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार देऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. ही चिल्लर कोणीच स्वीकारण्यास तयार नाही. याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या सूचनांनुसार पीएमपी प्रशासन आणि सेंट्रल बॅंक यांची बैठक घेऊनही या प्रश्‍नावर तोडगा निघालेला नाही. या प्रश्‍नातून मार्ग काढण्याची खासदार अनिल शिरोळे यांची घोषणा हवेतच विरली आहे.

पीएमपीने डेपोस्तरावर ही चिल्लर ठेवली आहे. मात्र, तिलाही नागरिकांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. चिल्लर पडून असल्याने त्याचा परिणाम पीएमपीच्या नियोजनावर होत आहे. ४ ऑक्‍टोबरपासून बॅंकेने ही चिल्लर घेण्यास नकार दिला होता. हा प्रश्‍न निकाली काढण्यात पीएमपी प्रशासन अपयशी ठरले आहे. पीएमपीच्या १३ आगारांची मिळून दररोज दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर जमा होते. 

हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आरबीआयने पीएमपी प्रशासन आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया यांच्यासमवेत चर्चा केली. त्या चर्चेमध्ये पीएमपी प्रशासनाने शक्‍य होईल, तेवढी चिल्लर स्वतः वापरामध्ये आणावी आणि कमीत कमी चिल्लर बॅंकेकडे जमा करावी, तसेच बॅंकेनेही शक्‍य होईल तेवढी चिल्लर घ्यावी, अशी अपेक्षा आरबीआयने व्यक्त केली. परिणामी, पीएमपी प्रशासनास जास्त चिल्लर वापरात आणावी लागणार आहे. 

बॅंकेने चिल्लर घ्यावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासंबंधी आरबीआयच्या माध्यमातून बॅंकेबरोबर बैठकही घेण्यात आली आहे. या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. तसेच पीएमपीच्या प्रत्येक डेपोवर ही चिल्लर ठेवण्यात आलेली आहे.
- सुभाष गायकवाड, प्रभारी जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

पीएमपीचे १३ आगार 
दररोज दीड ते दोन लाखांची चिल्लर
एकूण २० लाख रुपये पडून

Web Title: Rs 20 lakh coin collected by the PMP issue