
Pune Market Yard
Sakal
मार्केट यार्ड : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची सुमारे ९९.२७ एकर जमीन २९९ कोटी रुपयांना पुणे बाजार समितीच्या उपबाजारासाठी खरेदी करण्यास सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. मात्र, या व्यवहारात सर्व कायदेशीर बाबींचा विचार करूनच पुढे जावे, अशी मागणी पुणे बाजार समितीच्या काही संचालकांनी मासिक बैठकीत केली.