RTE Admission : आरटीई प्रवेशात १४ पालकांचा पत्ता बनावट; प्रवेश रद्द करून फौजदारी कारवाईचे आदेश

आरटीईच्या २५ टक्के प्रवेशात खेड तालुक्यात १४ प्रकरणांमध्ये पालकांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष वास्तव्यच नसल्याचे चौकशीत झाले उघड.
RTE admission

RTE admission

sakal 

Updated on

पुणे - आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी राखीव असलेल्या आरटीईच्या २५ टक्के प्रवेशात खेड तालुक्यात १४ प्रकरणांमध्ये पालकांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष वास्तव्यच नसल्याचे चौकशीत उघड झाले आहे. तक्रारीनंतर दोन शाळांमधील ५८ आरटीई अर्जांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ प्रकरणांमध्ये पालक संबंधित ठिकाणी राहत नसल्याचे स्थळ पडताळणीत स्पष्ट झाल्याने या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून संबंधित पालकांवर कायदेशीर, तसेच फौजदारी कारवाई करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com