

आरटीईच्या ४ हजारांहून अधिक जागा रिक्त
-----------
ॲग्रोवन वृत्तसेवा
-----------
पुणे : विद्यार्थ्यांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) पुणे जिल्ह्यात अद्याप ४ हजार १४० जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील ९१६ खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत १८ हजार ६० जागा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या प्रवेश प्रक्रियेसाठी तब्बल ५४ हजार ६८३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी लॉटरी पद्धतीने १७ हजार ७२८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र, आतापर्यंत केवळ १३ हजार ९२० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून अजूनही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत.
आरटीई कायद्याअंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. त्याबदल्यात शासनाकडून संबंधित शाळांना शुल्क प्रतिपूर्ती दिली जाते. मात्र, शासनाकडून कोट्यवधी रुपयांची प्रतिपूर्ती थकली असल्याची तक्रार शाळांकडून करण्यात येत आहे. ही थकबाकी लवकर मिळावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापनांनी केली आहे. या आर्थिक अडचणीमुळे अनेक शाळांकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, राज्यभरात आरटीई अंतर्गत ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध होत्या. यासाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज आले होते. लॉटरीद्वारे १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सध्या प्रतीक्षा यादीत ८६ हजार ३४ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना २३ मेपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
राज्यात अद्याप तब्बल ३४ हजार ९५५ जागा रिक्त असून, विद्यार्थ्यांना सोयीच्या परिसरातील शाळा उपलब्ध न झाल्याने अनेक पालकांनी प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.