
पुणे : मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील याच्या वाहनावर खासगी चालक असलेल्या व्यक्तीने सरकारी वेशात सरकारी वाहनांचा गैरवापर करीत केलेल्या लुटीचा ‘प्रताप’ शुक्रवारी (ता. १८) विधान परिषदेत आमदार ॲड. अनिल परब यांनी लक्षवेधीवेळी मांडला. ‘झिरो’ म्हणून या व्यक्तीने मोटार वाहन निरीक्षकाचा गणवेश परिधान करून वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली. हा प्रश्न मांडताना परब यांनी ‘आरटीओ’चे धिंडवडे काढले.