
Pune RTO : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय(RTO) आतापर्यंत २,१६,७५१ हाय सिक्युरिटी नोंदणी प्लेट्स (HSRP)साठी ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत. यापैकी ७९,४८३ वाहनचालकांनी अपॉइंटमेंट घेतल्या असून, ४०,९२४ वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात एप्रिल ३० पूर्वी सर्व २.१ कोटी वाहनांवर हाय सिक्युरिटी नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.सध्या,या प्रक्रियेसाठी वाहनचालक मोठ्या प्रमाणात पुढे येत असून,आतापर्यंत २ लाखांहून अधिक ऑर्डर्स नोंदवण्यात आल्या आहेत.