लोहगाव विमानतळावरच आता आरटीपीसीआर चाचणी ! 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 16 October 2020

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळाच्या आवारातच आरटीपीसीआरची चाचणी माफक दरात करता येणार आहे.चाचणीचा अहवाल येईपर्यंत हॉटेलमध्ये जाऊन राहायचे असेल तर,जिल्हा प्रशासनाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

पुणे - परदेशातून पुण्यातील लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळाच्या आवारातच कोरोनाच्या "आरटीपीसीआर' चाचणीची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. प्रवासापूर्वी या चाचणीसाठी प्रवासी नावनोंदणी करू शकतील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोहगाव विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी ट्विट करून ही माहिती दिली. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळाच्या आवारातच आरटीपीसीआरची चाचणी माफक दरात करता येणार आहे. चाचणीचा अहवाल येईपर्यंत हॉटेलमध्ये जाऊन राहायचे असेल तर, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. चाचणीची टेस्ट निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांच्या डाव्या हातावर आरटीपीसीआर निगेटिव्ह असा शिक्का मारणार आहे. ज्या प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह येईल, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी विमानतळावर चहा, कॉफी आणि खाद्यपदार्थांची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवासापूर्वी चाचणीसाठी प्रवाशांना नावनोंदणी करायची असेल तर tm_pune@aai.aero या ई-मेलवर संपर्क साधावा. ज्यांना ई-मेल करता येणार नाही, त्यांच्यासाठी हेल्प डेस्कवर माहिती मिळणार आहे, असेही कुलदीपसिंग यांनी स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विमानांच्या दोन फेऱ्या रद्द 
पुणे शहरातील पावसामुळे बंगळूर-पुणे मार्गावरील विमानाचे उड्डाण रद्द केले तर, हैदराबाद-पुणे मार्गावरील विमान अन्य मार्गाने वळविले. उर्वरित उड्डाणे नियमितपणे झाली, असे लोहगाव विमानतळ प्रशासनाने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTPCR test now at Lohgaon Airport