उरुळी कांचन - जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २२ जून रोजी सकाळी पूर्व हवेलीत प्रवेश करणार आहे. परंतु, हवेलीत प्रवेश करताना वारकऱ्यांना पुणे-सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा असणारा कचरा आणि पडलेले होर्डिंग याचा सामना करावा लागणार आहे. पालखी आगमनाच्या अनुषंगाने महामार्गाची कोणत्याही प्रकारची साफसफाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.