माळेगाव - 'माळेगावपासून आम्ही बाजूला गेलो आणि राष्ट्रवादी सत्तेत आली तेव्हा कारखान्यावर ११८ कोटींचे कर्ज होते. त्याउलट साखरेसह उपपदार्थ प्रकल्पामधील उत्पन्न १२४ कोटी रुपयांचे शिल्लक होते. वास्तविक ही कर्जाची आकडेवारी खरी, परंतू हे सत्ताधारी मंडळी सव्वाचारशे कोटींचे कर्ज आमच्या काळात होते असे खोटे सांगतात.