माळेगाव - महाराष्ट्रात एफआरपी ३१३२ रूपये एकरकमी देण्याचे सूत्र स्वीकारलेल्या माळेगावने आता सभासदांना दोनशे रुपये प्रतिटन खडकी पेमेंट देण्याचा ठराव आज मंजूर केला. हे बिल आदा करण्यासाठी प्रशासनाला सुमारे १५ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. आगामी कारखाना निवडणुकीच्या तोंडावर वरील धोरणात्मक निर्णय सत्ताधाऱ्यांचा मास्टर स्ट्रोक मानला जातो.