Indapur News : छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याची अफवा - वैभव नावडकर

नागरिकांनी अफवेवर विश्‍वास ठेवू नये- प्रांतधिकारी वैभव नावडकर यांचे आवाहन
rumor of chhatrapati sahakari sugar factory five-year election program announced politics
rumor of chhatrapati sahakari sugar factory five-year election program announced politicssakal

वालचंदनगर : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याची अफवा सोशल मिडीयावर फिरत आहे. यासंदर्भात बारामतीचे प्रांतधिकारी वैभव नावडकर यांनी छत्रपती कारखान्याची निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसल्याचा खुलासा केला आहे.

भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक गेल्या साडेतीन वर्षापासुन रखडली आहे. कारखान्याची अंतिम मतदार यादी गेल्या महिन्यामध्ये प्रसिद्ध झाली आहे.मात्र अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही. आज मंगळवार(ता.१४) रोजी संध्याकाळी छत्रपती कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून निवडणूकीचा कार्यक्रमाची खोटी पीडीएफ फाईल सोशल मिडीयावरती व्हायरल करण्यात आली आहे.

यावरती बारामतीचे प्रांतधिकारी,जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यांची नावे असून ३ नोव्हेंबर रोजी अधिसुचना काढली असल्याची तारीख आहे. तसेच १६ डिसेेंबर रोजी मतदार होणार असल्याचे लिहिले आहे. मात्र त्यांची सही सदरच्या कागदावरती नाही.

यासंदर्भात बारामतीचे प्रांतधिकारी वैभव नावडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की,छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली नाही.सोशल मिडीयावरती फिरणारा कागद खोटा असून नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये असे सांगितले.तसेच नागरिकांनी पोस्ट व्हायरल करु नये असे वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com