अजित पवारांशी घेतलेला पंगा अनिल भोसलेंच्या अंगाशी?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

भोसले यांच्यासह तानाजी पडवळ शैलेश भोसले, एस. व्ही जाधव हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.शिवाजीराव भोसले बँकेत कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ठेवीदारांची फसवणूक झाल्याप्रकरणी ११ जणांना विरोधात गुन्हा दाखल आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्यासह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात अनिल भोसले यांच्यासह चौघांजणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांशी पंगा घेतल्यानेच भोसले गजाआड झाल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

भोसले यांच्यासह तानाजी पडवळ शैलेश भोसले, एस. व्ही जाधव हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.शिवाजीराव भोसले बँकेत कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ठेवीदारांची फसवणूक झाल्याप्रकरणी ११ जणांना विरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात भोसले आणि त्यांचे काही नातेवाईक अडचणीत आले होते. भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधान परिषदेत दुसऱ्यांदा निवडून आले. त्यानंतर मात्र, पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांचे तिकिट कापण्यात आल्याने भोसले नाराज झाले आणि त्यांनी भाजपशी घरोबा केला. 

या निवडणुकीत त्यांच्या पत्नी रेश्मा या भाजपच्या नगरसेविका झाल्या. तेव्हा अनिल भोसले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वैर निर्माण झाले. मात्र, भाजपात आपल्याला फारशी किमत मिळत नसल्याने भोसले दांम्पत्य गेल्या काही दिवसांपासून भाजपातही नाराज होते. त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात जाण्याच्या प्रयत्नात ते होते. मात्र, महापालिका निवडणुकीत भोसले यांनी अजित पवार आणि काही नेत्यांवर वैयक्तिकरित्या तोंडसुख घेतल्याने अजित पवार त्यांच्या चिडले होते. या पार्श्वभूमीवर भोसले यांना अटक झाल्याचे मानले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rumors on ajit pawar behind of Anil Bhosale arrest in band fraud case