निरगुडसर - धावण्याचा कसलाही मागमूस नसताना देखील उतरत्या वयात अवघ्या ११ वर्षात एक, दोन नाही तब्बल १२८ पदके पटकावण्याची कामगिरी आंबेगाव तालुक्यातील खडकीफाटा येथील धावपटू हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी करून दाखवली आहे.
त्यामध्ये नुकत्याच कर्नाटकमध्ये पार पडलेल्या आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मास्टर गेम्समध्ये एकाच स्पर्धेत चार सुवर्ण पदक पटकावली आहे. त्यामुळे जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्ती जर असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतो, हे धावपटू हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी दाखवून दिले आहे.