राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

रुपाली चाकणकर यांना नुकतेच पुण्याच्या महिला अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्याची शक्यता होती. अखेर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली.

पुणे : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज (शनिवार) रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

रुपाली चाकणकर यांना नुकतेच पुण्याच्या महिला अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्याची शक्यता होती. अखेर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली.

चित्रा वाघ यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे समजते. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीने हे पक्षांतर होत असल्यासंबंधीचे फोटोही व्हायरल झाले आहेत. वाघ यांनी पक्ष आणि पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर ही निवड करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupali Chakankar selected on NCP women wing state president