Rupali Chakankar News : "मला आमदार व्हायचंय"; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली इच्छा | Pune News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Commission chairperson Rupali Chakankar News
Pune Politics : "मला आमदार व्हायचंय"; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली इच्छा

Rupali Chakankar News: "मला आमदार व्हायचंय"; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली इच्छा

Rupali Chakankar News: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच खडकवासला मतदारसंघातून आपल्याला निवडणूक लढवायची असल्याचंही चाकणकर म्हणाल्या आहे. २०१९ सालीही आपण प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं.

रुपाली चाकणकर यांनी 'सरकारनामा'ला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत रुपाली चाकणकरांनी सांगितलं की, आपण २०१९ मध्ये निवडणुकीच्या वेळी अजित पवारांकडे उमेदवारी अर्ज दिला होता. त्यावेळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होत्या, त्यात माझी मुलाखतही होणार होती.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

आपल्याला खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवायला आवडेल, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. २०१९ साली खडकवासला विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके यांचा थोडक्यात पराभव झाला होता.

राष्ट्रवादीत या मतदारसंघातून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यांच्याविषयी विचारलं असता चाकणकर म्हणाल्या,"स्पर्धक असेल तर काम करायला मजा येते.

कामाचं मूल्यांकन करता येतं. जिथं स्पर्धाच नसेल तर तुम्ही विजेता कसं ठरवू शकता. स्पर्धकच असेल तर तुम्ही जिंकू शकत नाही, त्यामुळे स्पर्धक असायला हवा. "

टॅग्स :Rupali chakankar