
पुणे - उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर नोकरी करत दरमहा ९७ हजार ८५१ रुपये कमावणारी पत्नी तिचा दैनंदिन खर्च भागविण्यास सक्षम आहे. पत्नीची एकूण परिस्थिती आणि तिची कमावण्याची क्षमता लक्षात घेता ती पोटगी मिळण्यास पात्र नसल्याचा निष्कर्ष काढत पत्नीने केलेला अंतरिम पोटगीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश प्रि. म. पाटील यांनी हा निकाल दिला.