pune road potholes
sakal
पुणे - पुणे शहरातील पादचारी मार्ग जागतिक दर्जाचे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ५८ कोटी ६० लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. तसेच यापूर्वी रस्ते रिस्टेटमेंट करण्यासाठी वादग्रस्त ठरलेल्या निविदा रद्द केल्या होत्या. आता त्यासाठी नियम व अटी बदलून स्वतंत्र निविदा काढली असून, संपूर्ण शहरातील रस्ते रिस्टेटमेंट करण्यासाठी ५७ कोटी ९० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांची मुदत १२ महिने असेल, तरी पुढील दोन महिन्यांत या दोन्ही कामांसाठी तब्बल ११६ कोटी ५० लाख रुपये खर्च होणार असून, यानंतर तरी पुणेकरांना चांगले रस्ते अनुभवण्यास मिळणार का याकडे लक्ष लागले आहे.