Ganja Seized : मुंढवा परिसरातून १७ लाख रुपयांचा गांजा जप्त
पुणे - मुंढवा परिसरात पोलिसांनी छापा टाकून सुमारे १७ लाख रुपयांचा २८ किलो गांजा जप्त केला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
अमली पदार्थ विरोधी पथक- दोनचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पोलिस अंमलदार आझाद पाटील यांना मुंढवा कोरेगांव पार्क रस्त्यावरील एका मोकळ्या प्लॉटमध्ये गांजा ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकातील पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
प्रमोद सुधाकर कांबळे (वय-४४, रा. किल्ला वेस, करमाळा, सोलापूर), विशाल दत्ता पारखे (वय-४१, रा. मोहननगर, विश्रांतवाडी, पुणे) यांच्या ताब्यातून १६ लाख ८० हजार रुपये किमतीचा गांजा आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला. या दोघांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक-२ चे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलिस अंमलदार आझाद पाटील, मयूर सुर्यवंशी, संदीप जाधव, संदीप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
