Biogas Project : बायोगॅस प्रकल्पासाठी १७० कोटींचा वाढीव खर्च? - ठेकेदाराला दर कमी करण्यासाठी दिले पत्र

पुणे शहरात रोज सुमारे २८०० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी ११०० टन ओला कचरा आहे, त्यापैकी केवळ ५९५ टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे.
Biogas Project

Biogas Project

sakal

Updated on

पुणे - तीनशे टन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदेत स्वयंभू ट्रान्सपोर्ट या कंपनीने तब्बल २ हजार ९० रुपये प्रतिटन इतका दर भरला आहे. त्यामुळे पुढील २० वर्षांत ९३८ कोटी रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. महापालिकेने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा हा खर्च ३८० रुपये प्रतिटन जास्त आणि एकूण खर्चापेक्षा १७० कोटी रुपये जास्त आहे. त्यामुळे महापालिकेने ठेकेदाराचा दर फेटाळून लावत दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com