

Gun Firing
पुणे - सहकारनगर परिसरात जीम व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणात मुख्य सूत्रधार योगेश माकस याच्या सांगण्यावरून अटक आरोपी परेश नागेश विसापुरे याने गोळीबार केला. या कामाबद्दल माकस हा विसापुरे याला २० लाख रुपये देणार होता, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी (ता. १७) न्यायालयास दिली.