
Katraj kondhwa Road
पुणे - कात्रज कोंढवा रस्त्याचे वर्गीकरण गेल्या आठ वर्षापासून रखडले आहे. प्राधान्याने करण्यात येणाऱ्या ५० मिटर रुंदीकरणासाठी भूसंपादन होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने २७० कोटी रुपये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील २२० कोटी रुपये हे वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत आज (ता. १२) निर्णय घेण्यात आला.