scholarship
sakal
वेल्हे, (पुणे) - केवळ आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण थांबू नये,या उदात्त हेतूने उच्चशिक्षित तरुणांनी एकत्र येत उभारलेल्या सोशल हंड्रेड फाउंडेशनच्या वतीने पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात रविवारी (ता.२२) रोजी महाराष्ट्रातील १०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तब्बल २५ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.