
पुणे - पुणे महापालिकेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे नियंत्रण कक्ष म्हणून इंटिग्रेटेड कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटर (आयसीसीसी) तयार करणे व अन्य सेवा पुरविणे हे काम अर्धवट आहे. अजून विविध मिळकती व सेवा सुविधांचे मॅपिंग अर्धवटच आहे. असे असताना आपत्ती व्यवस्थापन विभागाने महाप्रीत कंपनीला ५२ कोटींपैकी २९ कोटी रुपये दिले आहे.