Strawberry Cultivation
sakal
मंचर - पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ४ कोटी ९६ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ‘दिशा कृषी उन्नतीची-२०२९’ या उपक्रमांतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यांतील आदिवासी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे, अशी माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष तथाआमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.