पुणे - पुणे शहरातील टेकड्यांवर बांधकाम करण्यासाठी निर्बंध आहेतच, पण जागेचा मोबदला म्हणून ०.०४ ते ०.०८ टक्के असा अतिशय कमी टीडीआर दिला जातो. मात्र, आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व शासनाच्या स्तरावर डोंगर उतारावर वसलेल्या जनता वसाहत झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी तब्बल शंभर टक्के टीडीआर देण्याचा खटाटोप सुरु आहे. त्याची किंमत चालू बाजारभावानुसार सुमारे ७५० कोटी पेक्षा इतकी आहे. यातून नेमके कोणाचे भले होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.