पुणे : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने सलून चालकाच्या भावाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना वडगाव बुद्रूक परिसरात घडली. .रूपेश सुरेश भांदिर्गे (वय ४१, रा. नऱ्हे, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नीलेश सुरेश भांदिर्गे (वय ३८, रा. वारजे) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवराज गेजगे (रा. वडगाव बुद्रूक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..फिर्यादी नीलेश भांदिर्गे यांचे वडगाव बुद्रुक येथे सलूनचे दुकान आहे. आरोपी युवराजला रूपेशचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. १७ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपीने रूपेशला गाठले. जीव वाचवण्यासाठी रूपेश पळत असताना घरासमोर खाली पडला. आरोपीने शस्त्राने त्याच्या मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी केले. रुग्णालयात उपचारादरम्यान रूपेशचा मृत्यू झाला. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी घटनास्थळी भेट दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.