NEET Success Story : कला शाखेच्या विद्यार्थिनीची कमाल! प्रज्ञा मुठेने ‘नीट’मध्ये ४०९ गुण मिळवत रचला इतिहास; ग्रामीण विद्यार्थिनीची मोठी झेप

Arts student scores 409 in NEET exam: कला शाखेत अर्थशास्त्राचे शिक्षण घेत असताना नीटसाठी अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर प्रज्ञाची ४०९ गुणांसह ऐतिहासिक कामगिरी; महाविद्यालयातील पहिली नीट यशस्वी विद्यार्थिनी
Historic Success for Rajgurunagar College as Arts Student Scores 409 in NEET

Historic Success for Rajgurunagar College as Arts Student Scores 409 in NEET

sakal

Updated on

राजगुरुनगर : येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील प्रज्ञा भीमराव मुठे हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) ४०९ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे प्रज्ञा कला शाखेच्या द्वितीय वर्षात अर्थशास्त्र विषयाचे शिक्षण घेत आहे. नीट परीक्षेत यश मिळवणारी ती महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com