पाणंद रस्त्यांच्या कामांना गती

पाणंद रस्त्यांच्या कामांना गती
Published on

कळस, ता. १३ : मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते अभियानांतर्गत कळस (ता. इंदापूर) गावातील शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात गावातील उपलब्ध पाणंद रस्त्यांची माहिती संकलित करून त्यांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

शासनाच्या निर्णयानुसार तसेच बारामती उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथे अभियानाच्या कामकाजास सुरुवात करण्यात आल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी सांची कांबळे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, अभियानाची जनजागृती, प्रसिद्धी व माहिती संकलनासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, संबंधित अधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत चावडी वाचन करण्यात आले आहे. गाव नकाशामध्ये नमूद असलेले पाणंद रस्ते, तसेच नकाशामध्ये नोंद नसलेले मात्र प्रत्यक्ष वापरात असलेल्या शेतरस्त्यांची माहिती तपासून संकलित करण्यात येत आहे. यासाठी कळस तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आपल्या शेत-पाणंद रस्त्यांची आवश्यक माहिती प्रशासनाकडे कळविणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील पाणंद रस्ता, शेतरस्ता, त्याचे ठिकाण, वापराचा मार्ग तसेच उपलब्ध कागदपत्रे किंवा संबंधित माहिती कळवावी, जेणेकरून पात्र रस्त्यांची नोंद व पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी या अभियानाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ग्राम महसूल अधिकारी सांची कांबळे यांनी केले.

03708

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com