खेड्यास समूहभावाची परंपरा

खेड्यास समूहभावाची परंपरा
Published on: 

‘‘खेड्याकडे पाहताना केवळ जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि शोषणाच्या चष्म्यातून पाहून चालणार नाही; खेड्याला समूहभाव आणि सहानुभूतीची एक वेगळी परंपरा आहे. ग्रामीण समाजाचे हे वेगळेपण समजून घेण्यासाठी त्याच्या जगण्याच्या मुळांपर्यंत पोहोचावे लागेल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे पुरेसे नसून, तिचा दैनंदिन व्यवहारातील वापरही वाढवावा लागेल,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केले. दत्ता घोलप यांनी गवस यांच्याशी संवाद साधला. गवस यांनी लेखनप्रवासापासून देवदासी प्रथेचे निर्मूलन, शेतीचे प्रश्न, शिक्षणव्यवस्था, मराठी भाषेची स्थिती आणि समकालीन साहित्य आदी विषयांवर भाष्य केले.


गवस म्हणाले
- शहरी समाजात मी आणि माझे कुटुंब एवढाच विचार असतो. मात्र, खेड्यात माणसाबरोबरच पशू, पक्षी, प्राणी आणि कीटक यांच्या जगण्याला महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या शोषणाचे नवे मार्ग निर्माण झाले आहेत.

- आता रोपवाटिका, कृषी सेवा केंद्रे, कीटकनाशके आणि तणनाशकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खर्चात भर पडत आहे. शेती हा निर्जीव वस्तूंचे उत्पादन करणारा उद्योग नाही. सजीवाने सजीवासाठी केलेली निर्मिती म्हणजे शेती.

- शेतकरी बियाणे पेरतो तेव्हा तो त्या रोपाच्या वाढीबरोबर वाढत असतो. ही भावना आणि नाते समजून न घेता शेतीला केवळ उद्योगाच्या चौकटीत बसविणे मला मान्य नाही.

- साहित्य संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यासारख्या संस्थांना शासनाने पुरेसे बळ दिले पाहिजे. प्रत्येकाने आपले व्यवहार मराठीतून करण्याचा प्रयत्न केला तरी भाषेच्या संवर्धनाला मोठा हातभार लागेल.

- माणूस आपल्या जगण्याशी जितका प्रामाणिक असतो, तितके त्याचे लेखन अस्सल असते. नव्या लेखकांना जागतिक साहित्यिक संदर्भांचे ओझे देऊन बुजविण्यापेक्षा त्यांना त्यांच्या अनुभवविश्वातून लिहू द्यावे.

फोटो क्रमांक ः ६५८३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.