

शेटफळगढे, ता. १२ : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या तीन विद्यार्थिनींनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत घवघवीत यश संपादन केले. यात निरगुडे येथील स्वरा कोकरे, स्वरा भिसे आणि वायसेवाडीच्या अर्णवी कोळपे यांचा समावेश आहे.
निरगुडे येथील स्वरा दीपक कोकरे हिने ३०० पैकी २६४ गुण, तर स्वरा विनोद भिसे हिने २५६ गुण मिळविले. वायसेवाडी येथील अर्णवी कोळपे हिने २४४ गुणांसह जिल्हा स्तरावर चमक दाखवली. ग्रामीण भागातील या यशाबद्दल पालक आणि ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. योग्य संधी मिळाल्यास ग्रामीण विद्यार्थीही जिल्हास्तरावर ओळख निर्माण करू शकतात, हे या निकालाने सिद्ध केले आहे. या यशाबद्दल मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.