संसदीय निवडणुकीसाठी रशियामध्ये मतदान सुरू

संसदीय निवडणुकीसाठी
रशियामध्ये मतदान सुरू
Published on

मॉस्को, ता. १८ (पीटीआय) : रशियामध्ये आज संसदीय निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले. एकूण तीन दिवस मतदानप्रक्रिया चालणार आहे. युक्रेनविरोधात युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अध्यक्ष व्लादीमिर पुतीन आणि त्यांच्या ‘युनायटेड रशिया’ या पक्षाला कोणताही राजकीय विरोधक नसल्याने ही निवडणूक म्हणजे जनतेचा आपल्याला पाठिंबा असल्याचे जगाला दाखविण्यासाठीचा पुतीन यांचा कार्यक्रम आहे, असा आरोप होत आहे.
रशियातील या निवडणुकीसाठी ११ कोटी १० लाख मतदार आहेत. इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही मतदान करता येणार आहे. युक्रेन युद्धाला चार वर्षे उलटून गेल्यानंतरही ते निर्णायक स्थितीत आलेले नाही. उलट युक्रेनकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. या परिस्थितीत नागरिकांचा अद्यापही युक्रेनविरोधात लढण्यासाठी सरकारला पाठिंबा आहे, हे सरकारला दाखवून द्यायचे आहे, असा दावा राजकीय विश्‍लेषकांनी केला आहे. सत्ताधारी ‘युनायटेड रशिया’ला पराभवाची कोणतीही भीती नाही. काही छोटे पक्ष निवडणुकीत आहेत, मात्र विविध मुद्द्यांवर ते सरकारला नेहमी पाठिंबा देतात. त्यामुळे त्यांचे अस्तित्व टिकून आहे.
रशियाच्या ‘ड्युमा’ची (संसद) सदस्य संख्या ४५० आहे. यापैकी निम्म्या जागा पक्षांच्या नावावर असतात. रशियाचे मतदान दोन मतपत्रिकांद्वारे मतदान करतात. पहिल्या मतपत्रिकेत मतदार संसदेतील निम्म्या जागांसाठी पक्षाची निवड करतो. तर दुसऱ्या मतपत्रिकेद्वारे त्याच्या पसंतीचा उमेदवार निवडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com