
वेल्हे : राजगड तालुक्यातील गुंजवणी नदीवरील आस्कवडी ते कोदवडी परिसरातील गावांना जोडणारा लोखंडी पूल धोकादायक स्थितीत आहे. तो जड वाहनांना बंद करण्याच्या सूचना बांधकाम विभाग व पोलिस यंत्रणेस दिल्या असल्याची माहिती तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.