esakal | #SaathChal प्लॅस्टिकबंदी, स्वच्छतेबाबत वारकऱ्यांत विनोदातून जागृती
sakal

बोलून बातमी शोधा

जंक्‍शन (ता. इंदापूर) - प्लॅस्टिकबंदी, स्वच्छतेविषयी विनोदातून जनजागृती करताना कला पथकातील कलाकार.

#SaathChal प्लॅस्टिकबंदी, स्वच्छतेबाबत वारकऱ्यांत विनोदातून जागृती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वालचंदनगर - संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना जंक्‍शन (ता. इंदापूर) येथे प्लॉस्टिक बंदी, स्वच्छतेविषयी कला पथकाने विनोदातून संदेश दिला. 

संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या स्वच्छता दिंडीमधील कलापथक पाणी व स्वच्छता, तसेच प्लॉस्टिक बंदीविषयी संदेश देत आहेत. या कलापथकाने आज वारकऱ्यांमध्ये जंक्‍शन येथे वैयक्तिक स्वच्छता, शौचालयाचा नियमित वापर, वृक्ष लागवड, बेटी बचाव, प्लॅस्टिक बंदी आदी विषयावर विनोदातून जनजागृती केली. यात नगरमधील जागृती सामाजिक संस्था, लातूरमधील जय मल्हार सांस्कृतिक कलामंडळ, साताऱ्यातील आधार सामाजिक विकास संस्था, सांगलीतील शाहीर बजरंग आंबी संस्था आदींनी कला सादर केली. या वेळी सरकारचे स्वच्छता दिंडीप्रमुख उद्धव फड, सचिन अडसूळ, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रशांत जगताप, विशाल हांडोरे, हणुमंत गादगे उपस्थित होते.

loading image